प्रसूत महिलेला रुग्णवाहीका चालकाणे घाटात अर्ध्यावरच सोडले

प्रसूत महिलेची अनवाणी पायपीट

मोखाडा तालुक्यातील दुर्दैवी घटना

दीपक गायकवाड – मोखाडा

मोखाडा तालुक्यातील अति दुर्गम अशा आमले गावातील प्रसूत महिला श्रीमती सविता बांबरे हिला जव्हारहून घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेने आमले घाटात अर्ध्यावरच सोडल्याने ओल्या बाळंतनीला तब्बल दोन किलोमीटर बाळाला छातीशी कवटाळत डोंगर उताराची वाट अनवाणी तुडवण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे आरोग्य व्यवस्थापनाच्या बेमुर्वत कारभारा विरोधात सर्व स्थरातून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.

याबाबत समजलेली वास्तुनिष्ठ हकीकत अशी की, श्रीमती सविता बांबरे हिला प्रसूतीसाठी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.मात्र तिची येथे सुलभ प्रसूती शक्य नसल्याने तिला पुढे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात संदर्भ सेवा देण्यात आली होती. इथे तीची प्रसूती सुलभतेने झाली मात्र बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जव्हार येथील कॉटेज हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. येथे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करून बाळ बाळंतीनिला कॉटेज हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने त्यांच्याकडील रुग्णवाहीका उपलब्ध करून देऊन तिला सुखरूप पणे घरी सोडण्याची तजवीज केली होती. तथापी रुग्णवाहीका चालकाने प्रथम आडमुठेपणा करत सूर्यमाळ घाटात बाळबाळंतनीला हटवादीपणे अर्ध्यावरच सोडले. यावेळी सविताने व तिच्या पतीने हातापाया पडून विनंती केल्या नंतर त्यांना पुढे आमला फाटा येथे गावापासून दोन किलोमीटर मागेच सोडून दिले. व रुग्णवाहीका घेऊन चालक बेजबाबदाऱपने जव्हार येथे निघून गेला आहे. त्यामुळे सविता हिला आपले बाळ छातीशी कवटाळून डोंगर उताराची वाट अनवाणी तुडवीत जावी लागली आहे. या घटनेचे तीव्र पडसाड उमटले असून आरोग्य सेवेच्या अनास्थेबद्दल नापसंती व्यक्त केली जात आहे.

✓ बॉक्स

वारंवार विनंती करूनही आमच्या बाळबाळंतनीला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडले आहे. त्यामुळे आम्हाला तिथून पुढे दोन किलोमीटर चालत जाऊन घर गाठावे लागले आहे यादरम्यान सविताला काही अपघात झाला असता तर आम्ही आणि या नवजात लेकराने कोणाच्या तोंडाकडे पाहिले असते. यावर वरिष्ठ प्रशासनाने जरबेदाखल योग्य ती कार्यवाही करावी.

राजू बारात
प्रसूत महिलेचा पती,
आमला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *