तर खासदारांनी तपासली वस्तुस्थिती
दीपक गायकवाड – मोखाडा
वाडा तालुक्यातील आंबिस्ते या गावात असलेल्या कै.दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थांनी मध्यरात्रीच्या सुमारास झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली होती.या दुःखदायक घटनेची दखल घेत विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी तातडीने आत्महत्याग्रस्त कुटुंबांची व्यक्तीशः भेट घेऊन त्यांना आधाराचा हात देत सांत्वन केले आहे.
देविदास परशुराम नवले( वय 15)इयत्ता दहावी व मनोज सिताराम वड ( वय 14) इयत्ता नववी अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थांची नावे असून ते मौजे बिवलपाडा व दापटी ता.मोखाडा येथील रहिवासी आहेत.एकंदरितच या दुर्दैवी घटनेचे तीव्र पडसाद सर्वच थरातून उमटले असून या दुःखद घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पालघरचे खासदार डाॅ.हेमंत सवरा व मोखाडा तालुक्याचे भुमी पुत्र माजी जिप अध्यक्ष प्रकाश निकम यांनी घटनास्थळी धाव घेऊन वस्तूस्थितीची माहिती जाणुन घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिस आणि संबंधित प्रशासनाकडे केली आहे.
