अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फॉउंडेशन तर्फे कराओके सिंगिंग स्पर्धेचे आयोजन

कलाकारांना हक्काचं व्यासपीठ दिव्यांग सक्षमीकरणासाठी निधी
नवी मुंबई / ठाणे:
अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फॉउंडेशनच्या वतीने समाजातील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे व नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी हे उद्देशाने भव्य सिंगिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेचा मुख्य हेतू केवळ मनोरंजना पुरता मर्यादित न राहता, या माध्यमातून मिळणारा संपूर्ण निधी दिव्यांग व्यक्तींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. अपंग संजीवनी संस्था गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग, विधवा महिला व गरजू घटकांच्या पुनर्वसन, कौशल्य विकास व सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे.

कराओके स्पर्धेमुळे गायन क्षेत्रातील कलाकारांना प्रोत्साहन मिळणार असून समाजात सकारात्मक संदेश जाणार आहे की कला व समाजसेवा यांची सांगड घालूनही परिवर्तन घडवता येते. या उपक्रमास कलाकार, संगीतप्रेमी, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती व कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फॉउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.


अधिक माहितीसाठी:
अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फॉउंडेशन
(दिव्यांग व सामाजिक सक्षमीकरणासाठी कार्यरत संस्था)
Director
सुरेश दुधाने
9702345101

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.