“नानजीभाई ठक्कर यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान, लेखणीचे महत्त्व अधोरेखित”
ठाणे – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांचा सत्कार समाजसेवक नानजीभाई ठक्कर ठाणावाला आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि लेखणी देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर नानजीभाई ठक्कर म्हणाले, “लेखणीमध्ये जी ताकद आहे ती कुठल्याही शस्त्रात नाही. लेखणीच्या माध्यमातून समोरच्याला झुकवण्याचे सामर्थ्य आहे.”
या प्रसंगी दैनिक समर्थ गांवकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे यांचेही नानजीभाई ठक्कर यांच्या हस्ते विशेष स्वागत करण्यात आले.
हा सोहळा पत्रकारितेतील योगदानाचे मूल्य ओळखणारा आणि प्रेरणादायी ठरला.
