ठाणे प्रतिनिधी:
गाड्या, यंत्रणा किंवा विविध वस्तू आल्या की त्यांचे पूजन केले जाते—हे आपण सर्वांनी पाहिले आहे. परंतु मुंबईमध्ये आज एक वेगळाच आणि आगळा-वेगळा सोहळा अनुभवायला मिळाला. आदर्श इंजिनिअरिंग कंपनीने अशोक लेलँड घाटगे करकेरा पॉवर इंडस्ट्रीजच्या जनरेटरचे अत्यंत थाटामाटात, वाजतगाजत भव्य स्वागत करून हा सोहळा अनोखा ठरवला.



अनेक वर्षांपासून ग्राहकांचा परमोच्च विश्वास संपादन करणाऱ्या अशोक लेलँड कंपनीचा कोकणापासून मुंबईपर्यंत मजबूत दरारा आहे. कोणतीही नवी गाडी किंवा यंत्रणा घ्यायची असेल तर ग्राहकांचे लक्ष सर्वप्रथम या कंपनीकडेच वळते. त्यातच घाटगे करकेरा कंपनीचे दीर्घकाळापासूनचे तात्काळ सेवा देण्याचे धोरण ग्राहकांसाठी वरदान ठरते.
आज ग्रॅण्ड पीलोन येथे आयोजित सोहळ्यात आदर्श इंजिनिअरिंग कंपनीचे संचालक दशरथ चव्हाण आणि त्यांच्या टीमने नव्या जनरेटरचे फुलांनी, जल्लोषात स्वागत केले. “आमच्या घरी आलेला तो आमचा सहकारी आहे; तो व्यवसायात मदत करणारच. त्यामुळे त्याचे स्वागत करणे हे आमचे कर्तव्यच,” असे दशरथ चव्हाण यांनी सांगितले.

सोहळ्यात कमलेश (रिजनल हेड), वरुण सर (घाटगे करकेरा), टीम लीडर राहुल कदम यांची विशेष उपस्थिती होती. या भव्य स्वागत सोहळ्याची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे.
व्यवसायात वीजपुरवठा खंडित होणे म्हणजे अडथळा. म्हणून “संकटकाळी साथ देणारा खरा मित्र” हा संदेश देत आजही जनरेटरला व्यवसायिकांकडून मोठा मान मिळतो. सौर ऊर्जा प्रकल्प वाढत असले तरी तातडीच्या प्रसंगी ‘जे उपयोगाचे ते खरे’—अशीच धारणा अनेक व्यावसायिकांची आहे.
अशोक लेलँड–घाटगे करकेरा पॉवर इंडस्ट्रीजने कोकण व मुंबई विभागात तात्काळ सेवा, विश्वासू यंत्रणा आणि गुणवत्तेच्या बळावर मागील अनेक वर्षांत आपली स्वतंत्र छाप निर्माण केली आहे. “कॉल केल्यानंतर तात्काळ सेवा देणे हीच आमची ओळख. ग्राहकांचा विश्वास हेच आमचे भांडवल,” असे संचालक दशरथ चव्हाण यांनी सांगितले.
मुंबईत आज चर्चेचा विषय ठरला,
अशोक लेलँड कंपनीच्या जनरेटरचे फुलांनी सजलेले, भव्य, दिव्य स्वागत! अशीच भरारी घेत राहो ही जन मेट्रो परिवार कडून शुभेच्या
