मोखाडा येथे जगद्गुरु नरेंद्र महाराज पादुका दर्शन सोहळा

दीपक गायकवाड – मोखाडा

रविवार 21 डिसेंबर रोजी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळा मोखाडा येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
जगदुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन 21 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. हा भव्य संपन्न सोहळा मोखाडा येथे साजरा होणार असून या भक्ती पूर्ण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन जिल्हा अध्यात्म प्रमूख दिगंबर पाटील यांनी केले आहे.

सोहळ्याची सुरुवात ढोल-ताशे, टाळ मृदुंग, लेझीम पथके, कलशधारी महिला आणि सजीव देखाव्यांच्या उपस्थितीत श्रींच्या प्रतिकात्मक मिरवणुकीने होईल. त्यानंतर सिद्ध पादुका संतपीठावर विराजमान करून वेदमंत्रोच्चार व स्वागत आरतीसह पूजन करण्यात येणार आहे. जगदुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे सामाजिक बांधिलकीच्या विविध योजना राबविल्या जातात. या सोहळ्यात ‘दुर्बल घटक पुनर्वसन योजने’ अंतर्गत विधवा, परित्यक्ता प्रशिक्षित 21 महिलांना शिलाई यंत्रांचे वाटप केले जाणार आहे. संस्थानकडून देहदान जागृती, मोफत शिक्षण, वेदपाठशाळा, दवाखाना, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, महिला सक्षमीकरण उपक्रम यांसारखी कार्ये नियमित चालवली जातात. तसेच भाविकांच्या आगमन मार्गावर आरोग्य सेवा तैनात राहणार आहे.

सोहळ्यादरम्यान विशेष अध्यात्मिक प्रवचन, गुरुपूजन व उपासक दीक्षा होणार असून इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा समितीने केले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा :-

पादुका व गुरुपूजन सोहळा, श्रींचे पादुकाचे, आगमन, सामाजिक उपक्रम, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रववन, उपासक दीक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी असे कार्यक्रमाचे नियोजन असून या महन्मंगल समयी आपण सहकुटूंब, सहपरिवार, इष्टमित्र आप्तेष्टांसह कार्यक्रमास उपस्थित राहून पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन स्थानिक नियोजन समितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.