जिजाऊ रथयात्रा २०२५ – मराठा बहुजन जोडो यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

नवी मुंबई, २८ एप्रिल २०२५ – मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा २०२५ व मराठा बहुजन जोडो यात्रा या ऐतिहासिक उपक्रमाचा शानदार कार्यक्रम वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडला. सकाळी १० वाजता प्रारंभ झालेल्या या सोहळ्याला नवी मुंबईसह विविध भागांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या रथयात्रेत मराठा समाजासोबत बहुजन घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला, छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असा प्रत्येक व्यक्ती मराठा” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत जिजाऊंच्या विचारांचा जागर घडवण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी एकतेचा आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला.

ही रथयात्रा केवळ एक सोहळा नसून, समाजजागृतीची चळवळ आहे – असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

सहकार्य करणारे संघटनांचे मनःपूर्वक आभार:

मराठा सेवा संघ

जिजाऊ बिग्रेड

सकल मराठा समाज, नवी मुंबई

शिवजन्मोत्सव सोहळा समिती, नवी मुंबई

संभाजी बिग्रेड

व सर्व बहुजन संघटना, नवी मुंबई
ह्या कार्यक्रमाचा समारोप पुणे येथे होणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.