महागाव येथे राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषीदूत विद्यार्थ्यांनी आज श्री घटेश्वर मंदिर, महागांव परिसरात स्वच्छता अभियान राबविले. मंदिर परिसरातील कचरा संकलन, गवत व झाडाझुडपांची सफाई तसेच परिसर सुशोभीकरणाचे काम करण्यात आले.
मंदिर हे गावाचे श्रद्धास्थान असल्याने त्याची स्वच्छता व पवित्रता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दिला. तसेच स्वच्छता हीच सेवा आणि स्वच्छ गाव हीच खरी प्रगती या विचारांची जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमात सौरभ घरदाळे, रितेश जाधव, सुरज मुजावर, वैष्णव महाजन, अजय बाराते व प्रतीक करंजकरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत पुढील काळातही असे उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
भविष्यात गावात स्वच्छता, वृक्षारोपण तसेच जनजागृती अभियान राबविण्याचा मानस कृषीदूतांनी व्यक्त केला.
