म्हसा यात्रेतील गुरांचा बाजार उठला ?

मुरबाड |प्रतिनिधी
म्हसा यात्रा एकेकाळी बैलांच्या मोठ्या बाजारासाठी प्रसिद्ध होती. महाराष्ट्रभरातून शेतीपयोगी बैल, नांगर व शेतीची अवजारे विक्रीसाठी येथे येत असत. मात्र यंदा अवघ्या एका दिवसात गुरांचा बाजार उठल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शेती व्यवसाय तोट्यात गेल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले असून गोठ्यांत जनावरे उरलेली नाहीत. यात्रेत आलेले बहुतेक बैल हे शेतीसाठी नव्हे, तर हौशी लोकांच्या शर्यतीसाठीचे खिल्लारी बैल होते. हे बैल पहिल्याच दिवशी विकले गेल्याने गुरांचा बाजार ओस पडला.
यांत्रिक शेती, चाऱ्याचा अभाव व शेतीतील अनिश्चिततेमुळे बैलजोडी व नांगर इतिहासजमा होत असल्याचे वास्तव या यात्रेतून स्पष्ट झाले आहे. गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेली म्हसा यात्रा आता केवळ पर्यटन व हौशी लोकांची यात्रा बनत चालल्या चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.