नवी मुंबई:
नवी मुंबई ठाणे-बेलापूर रोडवर पनवेल वरून ठाण्याच्या दिशेने जात असताना MH04 MH 8242 हा सिमेंटने भरलेला ट्रक आज सकाळी पावणेश्वर ब्रिजच्या फुटपाथवर जाऊन जोरदार धडकला.
ट्रक एवढ्या वेगात होता की ब्रिजला लावलेली संरक्षणभिंत पूर्णपणे चक्काचूर झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनास्थळी पाहता असं स्पष्ट दिसतं की नवी मुंबई महानगरपालिका रोड प्रशासनाकडून त्या ठिकाणी संरक्षणभिंत असल्याचा कोणताही साईनबोर्ड किंवा इशारा फलक लावण्यात आलेला नाही. यामुळे वाहनचालकांना मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून, संबंधित विभागाने त्वरित योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.


प्रतिनिधी: विष्णू बुरे नवी मुंबई*
