नवरात्र उत्सवात नवदुर्गा महिला मंडळ, बोरीचापाडा येथे आमदार हरिश्चंद्र भोये यांची उपस्थिती.जव्हार प्रतिनिधी:

नवदुर्गा महिला मंडळ, बोरीचापाडा यांच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने विक्रमगड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. हरिश्चंद्र भोये यांनी मंडळाला भेट देत दुर्गामातेचे दर्शन घेतले.यानंतर गावदेवी पथक साखरशेत यांनी आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्य जपणारे तारपा नृत्य व ढोल नृत्य सादर केले. वाजत गाजत मान्यवरांचे सभामंडपापर्यंत स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या सदस्य तथा माजी सभापती ज्योतीताई भोये, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी, गावातील माजी सरपंच रामू महाले, गुरुनाथ महाले, नवदुर्गा मंडळाच्या संस्थापिका आदिवासी समाजसेविका मीराताई महाले, काशिनाथ भोये यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमात गावातील नुकतेच विद्युत सहाय्यक म्हणून तसेच अंगणवाडी सेविका म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी महिलांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षस्थानावर असलेले आमदार मा. हरिश्चंद्र भोये यांनी आपल्या मनोगतात सांगितले की –

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा,
ग्रामस्थांच्या कोणत्याही अडचणी निःसंकोचपणे माझ्यापर्यंत मांडाव्यात, त्यांचे निराकरण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन,
महिला बचत गटांनी नवीन उद्योगधंद्यांत उतरून स्वावलंबन प्राप्त करावे, त्यासाठी त्यांनी केशव सृष्टीमार्फत सुरू असलेल्या बांबू प्रक्रिया उद्योगाचे उदाहरण देत गावातील महिलांनीही असा रोजगार सुरू करावा असे आवाहन केले.
तसेच पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पा संदर्भात तरुणांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करून प्रशिक्षण घ्यावे व उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधींचा लाभ घ्यावा.

१९९४ पासून सुरु असलेले नवदुर्गा महिला मंडळ आजतागायत दुर्गामातेच्या आशीर्वादाने निरंतर कार्यरत आहे. या मंडळाच्या सातत्यपूर्ण सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक करत आमदार भोये यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे तसेच गावातील महिलांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान, सांस्कृतिक परंपरेचा गौरव आणि विकासाच्या नव्या संधी यांचा समन्वय साधणारा हा कार्यक्रम ग्रामस्थांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.