जनतेच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले निर्देश.
पालघर दि.११ सप्टेंबर : वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात परिवहन मंत्री,प्रताप सरनाईक, यांच्या अध्यक्षतेखाली लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
या लोक दरबारात आमदार राजेंद्र गावित, आमदार रविंद्र फाटक,महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी , अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त .दिपक सावंत, पोलीस उपायुक्त सुहास बावचे जिल्ह्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांच्या समस्यांचे त्यांच्या जिल्ह्याच्या, महानगरपालिकेच्या ठिकाणीच जलदगतीने निराकरण व्हावे, नागरिकांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करणेसाठी मंत्रालय किंवा इतर ठिकाणी फेऱ्या माराव्या लागू नये या हेतूने लोक दरबार घेण्यात येत असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या लोक दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या लोक दरबारामध्ये नागरिकांना आपले अर्ज, निवेदने सादर करण्यासाठी विविध शासकीय विभागनिहाय एकूण २० टेबल ठेवण्यात आले होते. सुरुवातीस उपस्थित नागरिकांना टोकन वाटप करण्यात आले. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नागरिकांच्या प्राप्त तक्रारींचे निवारण करून संबंधित विभागाकडे पुढील कारवाई साठी तक्रारी अर्ज पाठविण्यात आले. या लोक दरबारात एकूण ३२० तक्रारी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी काही तक्रारी अर्जांचे तात्काळ निवारण करण्यात आले. उर्वरित तक्रारी अर्जांचे त्या त्या विभागाला पाठवून तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित विभागांना दिले.
लोकदरबारा नंतर मंत्री प्रताप.सरनाईक यांनी उपस्थित ,जनतेचे व पत्रकार बांधवांचे आभार मानले.शेवटी राज्यगीत व राष्ट्रगीत होवून कार्यक्रम संपन्न झाला.
