खारघर (प्रतिनिधी):
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली रुद्राक्ष अनभवणे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
या सोहळ्यादरम्यान रुद्राक्ष अनभवणे यांना प्रभाग क्र. ०५ खारघर शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. या नियुक्तीबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की, “शिवसेना ही सामान्य जनतेच्या हक्कांसाठी झटणारी चळवळ आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिंदे साहेबांचे नेतृत्व हेच आमच्या कार्याचे प्रेरणास्थान आहे. पक्षाच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य करण्याचा माझा प्रयत्न राहील.”
या प्रसंगी मा. श्री रामदासजी शेवाळे साहेब (जिल्हाप्रमुख पनवेल-रायगड) व मा. श्री प्रसादजी परब साहेब (खारघर शहरप्रमुख) उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी रुद्राक्ष अनभवणे यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला खारघरमधील शिवसैनिकांसह स्थानिक कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. संपूर्ण परिसरात “जय महाराष्ट्र!” आणि “एकनाथ शिंदे साहेबांनो पुढे चला, आम्ही तुमच्यासोबत आहोत!” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
