सौरभ शिंदे फाउंडेशन नवरात्र उत्सवास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

( कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उमेश गवळी साहेब यांची उत्सवात भेट )

नवी मुंबई प्रतिनिधी घणसोली येथील नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवाचे आयोजन सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले या नवरात्र उत्सवास स्थानिक जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला असून विविध राजकीय पक्षाचे व सौरभ शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असून या नवरात्र उत्सव मंडळामध्ये अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्ते युवा वर्ग युवा तरुणी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन नवरात्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी उमेश गवळी साहेब यांनी या नवरात्र उत्सव मंडळास सदिच्छ भेट दिली असता सौरभ शिंदे फाउंडेशन नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी उमेश गवळी साहेब यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले आज पर्यंत चाललेल्या या नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवामध्ये या कार्यक्रमा ला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागलेले नाही नियोजन अगदी व्यवस्थित असल्याचेही श्री गवळी साहेब यांनी व्यक्त केले तसेच इतर मान्यवर ही या कार्यक्रमास उपस्थित होते यांचेही फाउंडेशन कडून स्वागत करण्यात आले अनेकांचे आकर्षण असलेले या नवरात्र उत्सव मंडळाने सर्वांची मने जिंकली आर्केस्ट्रा व दांडिया रास या खेळामुळे अनेक उत्साही प्रेमी आनंदी झाल्याचे स्थानिक जनतेकडून सांगण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.