पालघर, दि. २ ऑक्टोबर : महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवडा” निमित्त पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, कंचाड (ता. वाडा) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास खासदार डॉ. हेमंत सवरा , आमदार हरिश्चंद्र भोये , विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी , जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे ,अतिरिक्त जिल्हाधिकारी,भाऊसाहेब फटांगरे या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.

सेवा पंधरवडा निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन
आदी कर्मयोगी सेवा केंद्राचे उद्घाटन कंचाड येथे करण्यात आले.
पात्र कुटुंबांना अतिक्रमित रहिवासी जागांचे हक्कपत्रे वाटप करण्यात आले.
शाळा तिथे दाखला अभियानांतर्गत प्रातिनिधिक दाखल्यांचे वाटप झाले.
मान्यवरांनी नवीन घरकुल बांधकाम व रस्ते सीमांकनाची पाहणी केली.
अंभई येथे शेत रस्ता पाहणी व सीमांकन मोजणी करताना शेतकऱ्यांशी संवाद साधला.
पीएम जनमन योजनेअंतर्गत कातकरी बांधवांच्या घरकुल गृहप्रवेशास मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून कातकरी समाजाशी स्नेहसंवाद साधला.
मौजे हमरापूर येथे समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बचत गटांच्या विविध उत्पादनांच्या प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट दिली व महिला गटांच्या कार्याचे कौतुक केले.
या उपक्रमांमुळे नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळत असून, जिल्ह्यातील शिक्षण, निवास, पायाभूत सुविधा व ग्रामविकास क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येत असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.


