श्री क्षेत्र घुटकेश्वर महादेव मंदिरांत भक्तांची अलोट गर्दी.

दीपक गायकवाड – मोखाडा

वाकडपाडा येथे महाशिवरात्र निमित्ताने श्री घुटकेश्वर महादेव मंदिरांत पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. येथील मंदिर समितीच्या वतीने महाशिवरात्री च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पायी दिंड्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात शिवशंभोचा भावगर्भ नामघोष करत मंदिरात पदार्पण केल्याने मंदिर परिसर अक्षरशः शिवमय झाला होता.

यावेळी मंदिर समिती अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी शिवपुजेला आलेल्या शिवभक्तांचे स्वागत करुन देणगी दारांनाही शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आहे. सकाळ पासून च विविध गांवामधुन पायी दिंड्या भजन किर्तनाचा जयघोष करीत श्री घुटकेश्वराच्या दर्शनासाठी येत होत्या. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक, महाआरती, स्वाध्याय परिवाराचा सुश्राव्य कार्यक्रम, शिव किर्तन व रात्री भजन असा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथील घुटकेश्वर महादेव मंदिराला पुरातन इतिहास असून त्यामूळे या अतिप्राचीन शिवमंदिरात श्री घुटकेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी परीसरातील शेकडो भाविकांनी आज सकाळपासून च गर्दी केली असल्याचे पहावयास मिळाले.

तिर्थक्षेत्राला प्राचिन संस्कृती असल्याने महाराष्ट्र शासनाच्या तिर्थक्षेत्र विकास योजनेतून या ठिकाणी अनेक विकासकामे करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी परीसरातील अनेक व्यावसायिकांनी फराळ, खेळणी, गृह उपयोगी वस्तू चे स्टॉल लावले होते. त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने आलेल्या भाविकांना खरेदीचा आनंद देखील घेता आला आहे

या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या भाविकांचे आभार मंदिर समिती चे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.