दीपक गायकवाड – मोखाडा
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक मंडळ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार सुनील चंद्रकांत भुसारा हे ठाणे पालघर मतदारसंघातून १०८ पैकी ९५ मते मिळवत या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत तर त्यांच्या खालोखाल ९० मते मिळवत दिलीप पटेकर त्यांनीही विजय मिळवला आहे. तर जिजाऊ पुरस्कृत आणि भाजप पॅनल मध्ये सामील असलेले चिंतामण विलात यांना १६ तर विनोद शिंदा यांना केवळ ४ मते मिळाली.भुसारा हे मागील १५ वर्षांपासून या महामंडळात संचालक होते मात्र ही निवडणुकीत विरोधकांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती मात्र सहकार क्षेत्रातील त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने १०८ पैकी तब्बल ९५मते मिळवत भुसारा यांनी विरोधकांना मात दिली आहे.
महाराष्ट राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक पदासाठीची ही निवडणूक होती. ठाणे आणि पालघर जिल्हयातून २ संचालक निवडायचे होते. यासाठी चार उमेदवार रिंगणात होते. यामधून भाजपाकडून पॅनल बनविण्यात आला होता. तर भुसारा यांनी एकट्याने ही निवडणूक लढवत आपला विजय संपादन केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे मात्र दोन्ही जिल्ह्यातील या मतदारांपर्यंत जाऊन आपले सहकार क्षेत्रातील वर्चस्व देखील त्यांनी दाखवून दिले.या निवडीबाबत त्यांचे खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत अभिनंदन केले तर दोन्ही जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे भुसारा यांना महामंडळातील कामांचा चांगला अनुभव असल्याने शेतकरी बांधवांनी देखील आभार मानले आहेत.
” खरतर पक्ष विरहीत ही निवडणूक मी लढवली यामध्ये मी आणि राज्यातून सुद्धा अनेक ज्येष्ठ संचालक निवडून आले. सर्वप्रथम माझ्या मतदार बांधवांचे आभार मानतो तसेच प्रत्येक शेतकरी बांधव हा आमच्या महामंडळाचा कणा असून त्याच्या हितासाठी आता अधिक जोमाने काम करणार आहे.”
सुनील भुसारा
संचालक, आदिवासी विकास महामंडळ.
