सावधान.‌.! प्रेमाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप बदलतेय

||| व्हॅलेंटाईन विशेष |||

दीपक गायकवाड – मोखाडा

व्हॅलेंटाईन डे ची मुळे प्राचीन रोमन सण ‘लुपरकॅलिया’ (१५ फेब्रुवारी) मध्ये आहेत, जो वसंताच्या आगमनाचा आणि सुपीकतेचा उत्सव होता. ख्रिश्चन चर्चने ५ व्या शतकाच्या अखेरीस संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १४ फेब्रुवारीला हा दिवस अधिकृत केला‌‌. पूर्वी हा केवळ प्रणयाचा दिवस नसून, प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याचा एक पारंपारिक दिवस होता.परंतू कालौघात त्यात आमूलाग्र बदल झाला असून आज त्याचे अक्षरशः डिजिटलायझेन झालेले आहे.

कबूतर जा – जा कबूतर जा.! पहले प्यार का पहला संदेश,साजन को दे आ…या प्रघातापासून सुरू झालेला अलौकिक व्हॅलेंटाईन डेचे स्वरुप कालौघात बदलले आहेत आणि यंग जनरेशनने ” कालाय तस्मै नमः “म्हणत हे बदल अगदी बुध्दीपुरस्कर स्विकारलेले आहेत. सध्या प्रेमाचा आठवडा सुरू असून, प्रेमभावना व्यक्त करण्याच्या जुन्या पद्धती तर कालबाह्य झाल्याच आहेत. शिवाय अलीकडच्या काळात आकर्षक भेटकार्ड, लव्ह बर्ड देऊन व्यक्त केली जाणारी पद्धतही मागे पडली आहे. त्यामुळे डिजिटलच्या या जमानात प्रेमभावनाही डिजिटल झालेल्या आहेत.त्यामूळे एकेकाळी “प्रेमाला उपमा नाही” असे प्रेमगीत आळवणाऱ्या कालकथीत पिढीला आजच्या डिजिटल प्रेमाशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही.

तरुणाईचे आकर्षण असलेला ‘व्हॅलेंटाइन डे’ १४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. प्रेमाचा आठवडा म्हणून हा आठवडा साजरा केला जातो. या काळात आपल्या प्रियकरासमोर प्रेम व्यक्त करण्याची संधी असते. त्यामुळे प्रेम कसे व्यक्त करायचे? तर त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जात आहे. सुरुवातीच्या काळात पत्र लिहून किंवा थेट शब्दांच्या माध्यमातून भावना व्यक्त होत होत्या. त्यानंतर आकर्षक भेटकार्ड देण्याची पद्धत सुरू झाली. त्यातही बदल होत म्युझिकल भेटकार्ड, डिजिटल भेटकार्ड आले. मात्र, मागच्या काही वर्षांत ही पद्धतही बदलली आहे. सोशल मीडियाचा वापर वाढला असून, वेगवेगळे व्हिडीओज् आणि पोस्टचा वापर प्रेम व्यक्त करण्यासाठी केला जातो. व्हिडीओ कॉलिंग, ऑनलाइन मॅसेजिंग, चॅटिंग वाढली आहे. त्याचा परिणाम मात्र भेटकार्ड विक्रीवर झाला आहे. तरुणाईच्या मनामनातील भावना ‘व्हॅलेंटाइन डे’ वीकच्या निमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करीत व्यक्त करण्यात येत आहेत.

एकेकाळी प्रेम व्यक्त करण्यासाठी हाताने लिहिलेली पत्रे, गुलाबाचे फूल आणि प्रत्यक्ष भेटी यांनाच महत्त्व होते. मात्र तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढलेल्या युगात प्रेमाच्या अभिव्यक्तीची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आजच्या डिजिटल युगात प्रेम भावना मोबाईलच्या स्क्रीनवरून व्यक्त होताना तर व्हॅलेंटाईन डेनिमित्त तरुणाई सोशल मीडियावर जगजाहीर प्रेम व्यक्त करताना दिसते. इंस्स्टोटाग्रामवर रील, फेसबुक पोस्ट्स आणि व्हाटस् ऐप स्टेटसच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या जात आहेत. “हार्ट” इमोजीपासून खास व्हिडिओ रीलपर्यंत प्रेमाची भाषा अधिक आकर्षक , मॉडर्न आणि तातडीची झालेली आहे.

✓ प्रेमाच्या अभिव्यक्तीचे डिजिटल फंडे….

आपल्या आवडत्या व्यक्तीला हटके पद्धतीने प्रपोज करावे, असे प्रत्येकाला वाटते. पूर्वी प्रेमपत्र, तसेच गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त केले जात होते. आता यांत्रिक युगात प्रेमपत्राची जागा मेसेजने घेतली आहे. मोबाइलवर आता फिल्मी डायलॉगचा भडिमार होत आहे. त्यामुळे प्रेमाची कबुली देण्याचे विविध फंडे तरुणाई वापरत आहे.हे ही नसे थोडके.

ऐतिहासिक संदर्भ: १५ व्या शतकातील कवी जेफ्री चौसर यांनी या दिवसाला रोमान्सशी जोडले, ज्यामुळे तो प्रणयदिन म्हणून ओळखला जाऊ लागला.
दंतकथा: सम्राट क्लॉडियस II च्या विवाहास बंदी घालण्याच्या आदेशाला न जुमानता तरुण सैनिकांचे विवाह लावून देणाऱ्या सेंट व्हॅलेंटाईनला १४ फेब्रुवारीला फाशी देण्यात आली होती, असे मानले जाते.
आधुनिक परंपरा: पूर्वीच्या काळी एकमेकांना हाताने बनवलेली पत्रे (Valentines) पाठवण्याची परंपरा होती.
व्हॅलेंटाईन वीक (१४ फेब्रुवारीच्या आधीचे दिवस):
१४ फेब्रुवारीच्या एक आठवडा आधीपासून प्रेमाचे प्रतीक म्हणून विविध दिवस साजरे केले जातात.
७ फेब्रुवारी (रोज डे): गुलाब देऊन भावना व्यक्त करणे [११]।
८ फेब्रुवारी (प्रपोज डे): प्रेमाची कबुली देणे [८]।
९ फेब्रुवारी (चॉकलेट डे): नात्यात गोडवा वाढवणे.
१० फेब्रुवारी (टेडी डे): प्रेमाचे प्रतीक म्हणून टेडी बेअर देणे.
११ फेब्रुवारी (प्रॉमिस डे): वचन किंवा वचनबद्धता देणे‌
१२ फेब्रुवारी (हग डे): मिठी मारून भावनिक आधार देणे‌
१३ फेब्रुवारी (किस डे): प्रेमाची उत्कटता व्यक्त करणे.
१४ फेब्रुवारी (व्हॅलेंटाईन डे): मुख्य प्रेम दिन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.