सांगवडे (मावळ) : मावळ तालुक्यातील सांगवडे गावात ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी कन्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महात्मा फुले कृषी महाविद्यालय राहुरी संलग्न पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी येथे शिक्षण घेत असलेल्या कृषी कन्या कृषी विषयक अभ्यासक्रमासाठी सांगवडे येथे दाखल झालेल्या आहेत. या अभ्यास क्रमांतर्गत कृषी कन्या 3 महिन्याच्या कालावधीत प्रत्यक्ष गावात वास्तव्यास राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांचे शेतीविषयक अनुभव विविध प्रयोगशील शेती पद्धती यांचा सखोल अभ्यास करणार आहेत .
यावेळी सांगवडे गावचे विद्यमान सरपंच श्री रोहन जगताप, उप. सरपंच ललिता लिमन तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कृषी कन्या नंदिनी दोरगे, प्रेरणा धोत्रे, दिशा चव्हाण, सई पाटील, श्वेता मारडकर यांचे श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सांगवडे गावात कृषी कन्यांचे उत्साहात स्वागत.
