आदिवासी विद्यार्थ्यांचा एमटीएस ऑलिम्पियाड राज्यस्तरीय स्पर्धेला गवसणी
दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील पोऱ्याचा पाडा या दुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेतील चार विद्यार्थ्यांनी एमटीएस ऑलिम्पियाडच्या राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून परिसराचा बहूमान वाढवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतानाही या विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ही कामगिरी केली आहे. राज्यभरातून हजारो विद्यार्थी सहभागी झालेल्या या स्पर्धेत पोऱ्याचा पाडा…
मोहिते महाविद्यालयात ‘जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन’ साजरा
राजभाषा दिनानिमित्त महाविद्यालयात निबंध स्पर्धा दीपक गायकवाड – मोखाडा ” पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका… मीच विनविते हात जोडून, वाट वाकडी धरू नका या काव्यपंक्तीतून समस्त भारतीयांना स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरिता स्वातंत्र्यदेवीच्या कल्पनेतून विनंती करणारे मराठी भाषेतील थोर साहित्यिक कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने गिरीवासी सेवा मंडळ, कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी वरिष्ठ…
पाण्यासाठी सायदे ग्रामस्थांचे थेट टाकीवर धरणे आंदोलन
सायदे आणि बारा पाड्यात तीव्र पाणीटंचाईजेजेएमच्या अपूर्ण कामामुळे पाण्याचे दुर्भिक्ष दीपक गायकवाड – मोखाडा सायदे महसूल ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वाघ्याची वाडी, सावरपाडा, हट्टीपाडा, अंधेरवाडी, हुंड्याची वाडी, बादलपाडा, खडकवाडी, मारुतीचीवाडी, बोरीचीवाडी, जांभूळवाडी इत्यादी 12 गाव पाड्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे येथे तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी यासाठी सायदे आणि बारा गाव पाड्यातील ग्रामस्थांनी थेट जलजीवन मिशन…
28 फेब्रुवारी रोजी वाशिम येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे 27 राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन मुंबई
प्रतिनिधी/वाशिम : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता वैकंठधामवासी मातोश्री सौ. स्नेहलता पुनमचंद सोमाणी परिसर वाटाणे लॉन वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार व पदाधिकारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर…
मावळचा सन्मान: खासदार मा.श्री.श्रीरंग आप्पा बारणे यांची इंडिया-बाल्टिक फ्रेंडशिप ग्रुपमध्ये निवड!
इंडिया–बाल्टिक पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपमध्ये सदस्य म्हणून शिवसेनेचे मावळचे लोकप्रिय खासदार मा.श्री.श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांची झालेली निवड ही मावळसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे ! 💐🏹 या ऐतिहासिक क्षणी शिवसेनेचे खारघर शाखाप्रमुख व शिव उद्योग खारघर शहर प्रमुख रुद्राक्ष अनभवणे यांनी साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी उंची लाभो, अशी सदिच्छा व्यक्त…
पालघर-डहाणू किनारपट्टी मार्गाचा कायापालट; १६५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
पालघर: पालघर जिल्ह्यातील दळणवळण आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या डहाणू-पालघर (सागरी महामार्ग) मार्गाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल १६५ कोटी ६९ लाख रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. माजी खासदार तथा आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन पार पडले. गेल्या ४० ते ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच या मार्गाचे इतक्या मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण होत…
नगरसेवकपदी निवडीबद्दल त्रिवार अभिनंदन
जावळीतालुक्याचे सुपुत्र ता.सातारा श्री अंकुश बाबा कदम यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवडीबद्दल त्रिवार अभिनंदन 💐💐💐आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने भविष्यात ही अशीच यशस्वी वाटचाल होत राहो 🙏👍Ankush Kadam Ankush Babaमनःपुर्वक अभिनंदन #बाबा
बारामती विमान दुर्घटना : ‘अपघात की घातपात?’ – रोहित पवारांचे गंभीर आरोप, चौकशीवर सवाल
बारामती येथे घडलेल्या खासगी विमान दुर्घटनेनंतर वातावरण आणखी तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत थेट सवाल उपस्थित करत, हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केला. मुंबई आणि दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर तपास यंत्रणांची हालचाल वाढली असली, तरी चौकशीची दिशा आणि गती संशयास्पद असल्याचा…
महागावात कृषीदूतांकडून श्री घटेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
महागाव येथे राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषीदूत विद्यार्थ्यांनी आज श्री घटेश्वर मंदिर, महागांव परिसरात स्वच्छता अभियान राबविले. मंदिर परिसरातील कचरा संकलन, गवत व झाडाझुडपांची सफाई तसेच परिसर सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. मंदिर हे गावाचे श्रद्धास्थान असल्याने त्याची स्वच्छता व पवित्रता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दिला. तसेच…
श्री क्षेत्र घुटकेश्वर महादेव मंदिरांत भक्तांची अलोट गर्दी.
दीपक गायकवाड – मोखाडा वाकडपाडा येथे महाशिवरात्र निमित्ताने श्री घुटकेश्वर महादेव मंदिरांत पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. येथील मंदिर समितीच्या वतीने महाशिवरात्री च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पायी दिंड्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात शिवशंभोचा भावगर्भ नामघोष करत मंदिरात पदार्पण केल्याने मंदिर परिसर अक्षरशः शिवमय झाला होता. यावेळी मंदिर समिती अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी…
