तालुका अध्यक्ष म्हणून महेंद्र पाचलकर यांची तर तालुका सचिव म्हणून मनोज काकवा यांची निवड
डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय)चे १३ वे शहापूर तालुका अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी समाज हॉल भोसपाडा, शहापूर येथे हे एक दिवशीय अधिवेशन भरवण्यात आले होते. अधिवेशनात १३६ पेक्षा जास्त प्रतिनिधींची उपस्थिती होती. अधिवेशनाची सुरुवात डीवायएफआयचे ध्वज फडकावून करण्यात आली.
उद्घाटन सत्र

अधिवेशनाचे उद्घाटन डीवायएफआयचे माजी राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड प्रकाश चौधरी यांनी केले. अधिवेशनास किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड कृष्णा भावर,डीवायएफआयचे जिल्हा सचिव कॉ.राजेश दळवी, डीवायएफआयचे जिल्हा सहसचिव कॉ. भरत वळंबा,
जिल्हा कमिटी सदस्य कॉ.विलास गहला, कॉ. टोलूराम चौधरी, यांनी मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी तालुका उपाध्यक्ष भरत वळंबा हे होते.
प्रतिनिधी सत्र
त्यानंतर अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्राला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या अध्यक्ष मंडळाचे कामकाज शाम निखडा, महेंद्र पाचलकर, मिरा दरोडा यांनी तर संचालन कमिटीचे कामकाज भास्कर म्हसे, यांनी केले. मनोज काकवा यांनी ‘डीवायएफआयच्या मागील कार्याचा, तालुक्यातील रोजगार, राजकीय, सामाजिक परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल’ मांडला. त्यावर प्रतिनिधींनी युनिटनिहाय गटचर्चा केली व त्यानंतर प्रतिनिधींनी त्यावर आपले मत व्यक्त केले. त्यानंतर सर्वानुमते अहवाल संमत करण्यात आला.

नवीन तालुका कमिटीची निवड
या अधिवेशनात २९ सदस्यांची डीवायएफआयची नवीन तालुका कमिटी निवडण्यात आली. त्यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून महेंद्र पाचलकर यांची तर तालुका सचिव म्हणून मनोज काकवा यांची एकमताने निवड करण्यात आली. तालुका उपाध्यक्ष म्हणून भरत वळंबा, शाम निखडा तालुका सहसचिव म्हणून रशिद शेख,रामदास कोदे तर कोषाध्यक्ष म्हणून नंदिनी म्हसकर यांची निवड करण्यात आली.
तालुका कमिटी सदस्य म्हणून नितीन काकरा, आनंद रोज,अरुण घाटाळ,चंद्रकांत वैजल,उत्तम बुधर,भास्कर म्हसे,रवी माहुरे,मिरा दरोडा,पांडुरंग पोकळा,दिनेश बरफ,विजय कलिंगडा,सीताराम बरफ,पुंडलिक पागी,विश्वास दळवी, निलम गांगोडा,विलास अंधेर,संतोष बोंड,प्रवीण जनाठे,दिलीप रोज,गुरुनाथ थलेकर,संतोष थाळकर तर एक रिक्त जागा ठेऊन असे एकूण २९ सदस्यांची कमिटी निवडण्यात आली.
समरोप
डीवायएफआयच्या नवनिर्वाचित शहापूर तालुका कमिटीचे नेतृत्व व सर्व नव्याने निवड झालेल्या सदस्यांचे उपस्थित वरिष्ठ नेतृत्वाने स्वागत केले.या अधिवेशनात तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून तरुण प्रतिनिधी सहभागी झाले होते.अधिवेशनाचा समारोप गगनभेदी घोषणांनी करण्यात आला.
महेंद्र पाचलकर/मनोज काकवा
