आंतर महाविद्यालयातील नृत्य स्पर्धेत वाडी च्या कुमारी नुपूर अनिल बाजाईत प्रथम पुरस्काराची मानकरी

नागपूर दि.11/04/2026 ला.झालेल्या नोवा स्टेलर आंतर महाविद्यालयीन स्पर्धा एस एफ कॉलेज सेमिनरी हिल नागपूर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.नागपुर मधील नामांकित कॉलेजच्या प्रतिस्पर्धीनी या स्पर्धैमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.कुमारी नुपूर अनिल बजाईत ही एस एफ कॉलेजमध्ये आर्ट विभागात प्रथम वर्षा त शिक्षण घेत आहे, यापूर्वी सुद्धा कु.नुपूर बजाईत हीने हैद्राबाद राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला होता.काल झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट नृत्य सादर करून आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला पाहणाऱ्या प्रेक्षकांची तथा पंचांची मने जिंकली. कॉलेजमध्ये प्रथम पटकावल्यामूळे सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.तिच्या यशामागे तिचे कठिण परीश्रम आहे असे तिचे वडील श्री अनिल बजाईत तथा आई सौ वैशाली बजाईत यांनी सांगितले.वाडीतील श्री मोतीराम शहारे,श्री रोशन वैद्य,श्री उमेश साहु,दिपक अवचट अनिल दहाघाणे,श्री अविनाश टाके,श्री रामेश्वर वाडीमस्मे,प्रीती चौधरी,देवा क्षिरसागर , संजय जिवनकर यांनी कु.नुपूर अनिल बजाईत हिचे कौतुक केले असुन तिचे महाराष्ट्र भर नातेवाईक आनंद वक्त करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *