शांघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धांना सुरुवात

पालघर, दि. १२ – जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. ऑलिम्पिकसारखीच ही स्पर्धा २३ वर्षाखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. याआधीच्या ४७ व्या स्पर्धेत ६३ सेक्टरमधील ५० देशांतील १०,००० हून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला होता. पुढील जागतिक कौशल्य स्पर्धा सन २०२६ मध्ये शांघाई (चीन) येथे होणार आहे.

त्याअनुषंगाने राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा, विभाग, राज्य व देशपातळीवर स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांचे नामांकन शांघाई येथील जागतिक स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

पात्रता निकष

५० क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००४ किंवा त्यानंतरचा असावा.

Digital Construction, Cloud Computing, Cyber Security, ICT Network Infrastructure, Additive Manufacturing, Industrial Design Technology, Industry ४.०, Mechatronics, Optoelectronic Technology, Robot Systems Integration, Water Technology, Dental Prosthetics, Aircraft Maintenance या क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००१ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.

सहभागासाठी आवाहन
जिल्हा व राज्यातील ITI, पॉलिटेक्निक, MSME Tools Rooms, CIPET, IIT, अभियांत्रिकी महाविद्यालये, IHM/Hospitality Institutes, Corporate Technical Institute, Skill Training Institutes, Colleges, Maharashtra State Skill University, MSBVET, Fine Arts College, Institute of Jewellery Making यांसह विविध शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थांना या उपक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत खालील लिंकवर करावी:
👉 https://www.skillindiadigital.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.