पांगरीतील दुर्दैवी घटना
दीपक गायकवाड – मोखाडा
मोखाडा तालुक्यातील मौजे पांगरी या दुर्गम गावात दुर्दैवी घटना घडलेली आहे. येथील वाळ्या लाडक्या वाजे वय वर्ष 47 राहणार पांगरी यांचा त्यांचाच मुलगा ईश्वर वाळ्या वाजे वय वर्ष 22 याने निर्घृण खून केलेला आहे अशी प्राथमिक माहिती मोखाडा पोलिसांकडून समजलेली आहे. मात्र हत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
याबाबत मिळालेल्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी दुपारी 1-30 ते 2 च्या सुमारास ईश्वर बाळ्या वाजे याने त्याचे वडील वाळ्या लाडक्या वाजे यांचा खून केला आहे. याबाबतची वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी मोखाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता वरील प्रमाणे प्राथमिक माहिती येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत दहिफळे यांचे कडून मिळालेली आहे. परंतु वस्तुस्थिती निदर्शक माहिती अद्याप हाती आलेली नाही मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास व घटनेमागील पार्श्वभूमी समजून घेत आहेत.
त्यानंतर त्याबाबतची सविस्तर घटना समोर येणार आहे.ईश्वर वाळ्या वाजे यांच्याकडे अधिक तपास करीत असता तो त्याबाबत काहीच बोलायला तयार नसल्याचे समजते.
