प्रेस नोट
दिनांक: 12 मार्च 2026
वार: गुरुवार
वेळ: सायं. 4:00 वा.
आज दिनांक 12/03/2026 रोजी अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था, महाराष्ट्र तसेच अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने दिव्यांग मंत्रालयाचे सचिव माननीय Tukaram Mundhe साहेबांची सदिच्छा भेट घेण्यात आली.
या भेटीदरम्यान दिव्यांग बांधवांना भेडसावणारे विविध महत्त्वाचे प्रश्न, त्यांच्या हक्कांशी संबंधित अडचणी तसेच दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दिव्यांगांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर माननीय मुंढे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत “आपण याबाबत सविस्तर अर्ज द्या, संबंधित प्रश्न नक्की मार्गी लावण्याचा प्रयत्न करू” असे आश्वासन दिले.
ही भेट दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत शासन स्तरावर सकारात्मक पाऊल ठरणार असून संस्थेच्या वतीने लवकरच सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार आहे.
या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व संचालक श्री. सुरेश दुधाने, उपाध्यक्ष सौ. शोभा काळे, संस्थेच्या कायदेशीर मुख्य सल्लागार तसेच सामाजिक न्याय बोर्ड महाराष्ट्र राज्य समन्वयक सौ. वनिता फडतरे आणि कार्यकर्ते श्री. सुनील धाडवे हे उपस्थित होते.
दिव्यांगांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही संस्थांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून शासन व समाजाच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढील काळात अधिक प्रभावी काम करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांची ‘अपंग संजीवनी संस्थे’कडून भेट; प्रलंबित प्रश्न सुटण्याचे आश्वासन
