वाशी (प्रतिनिधी) :
श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाशी येथील सिडको एक्झीबिशन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात व उपस्थितीत संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व कुलस्वामी खंडोबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या घोषणांनी व आरतीने करण्यात आली.

सभेचे अध्यक्षस्थान शंकर लक्ष्मण पिंगळे यांनी भूषविले तर उपाध्यक्ष शरददादा भिमाजी सोनवणे (आमदार, किल्ले शिवनेरी, जुन्नर तालुका, महाराष्ट्र राज्य) प्रमुख उपस्थित होते. या वेळी श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष यांनी वार्षिक सभेची नोटीस सर्व सभासदांसमोर सविस्तर वाचून दाखवली.
या सभेसाठी संस्थापक श्री कुलस्वामी सहकार मंडळ मुंबई वडज यांचे संस्थापक सदस्य आवर्जून उपस्थित होते.


सभेसाठी संचालक मंडळातील भास्कर डोके, संतोष ज्ञानेश्वर चव्हाण, चंद्रकांत वऱ्हाडी, संजय मुरलीधर चव्हाण, विजय आत्माराम शेळके, सुनील किसन चव्हाण, हरिश्चंद्र यशवंत थोरात, विकास गबाजी दाभाडे, निलेश वामन बोरचटे, दशरथ पोखरकर, संतोष डुंबरे, रवींद्र जाधव, संतोष घोटणे, शिल्पा मोरे, चंद्रकांत धोंडू चव्हाण, किशोर नानाभाऊ मोरे, सुधीर चव्हाण, संदीप रणपिसे यांच्यासह अधिकारी वर्ग, शाखा व्यवस्थापक आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सभेतील सर्व कार्यवाही शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
प्रतिनिधी: दशरथ चव्हाण सह विष्णू बुरे, नवी मुंबई
