अस्मिता राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट लीग महाराष्ट्र नाशिकमध्ये भव्य स्पर्धेचे आयोजन

नाशिक : अस्मिता राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट लीग महाराष्ट्र या स्पर्धेचे आयोजन स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया साई च्या मान्यतेने व इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन च्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोशियन ने सर्वेश्वर महादेव ट्रस्ट च्या इंदोर हॉल तपोवन नाशिक येथे २१ ते २२ मार्च २०२६ रोजी सर्व वयोगटातील महिला खेळाडूंसाठी केले आहे स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील ८०० महिला खेळाडू सहभागी होणार आहेत या स्पर्धेची सर्व व्यवस्था विनामूल्य करून खेळाडूंना चांगली सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये नाशिक मधील ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २१ मार्च रोजी सकाळी १० वाजता होईल व स्पर्धेचा अंतिम बक्षीस समारंभ २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते होईल
पिंच्याक सिल्याट इंडोनेशियन मार्शल आर्ट चा खेळ प्रकार असून (१) ट डींग (फाईट) (२) तुंगल (सिंगल काता) (३) रेगु (ग्रुप काता), (४) गांडा (डेमी फाईट) (५) सोलो (इव्हेंट) या पाच प्रकारात खेळला जातो. सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रिडा मंत्रालय, भारत सरकार यानी आपल्या ५% राखीव नोकर भरती मध्ये केला आहे. या खेळाला “युवक कल्याण आणि किडा मंत्रालय भारत सरकार”, “भारतीय विश्ववि‌द्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड ऑलिम्पिक काउंसिल ऑफ एशियायी ची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व ऐशियन बीच गेम, नॅशनल गेम्स, खेलो इंडिया बीच गेम्स, अस्मिता खेलो इंडिया लीग अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळला जातो त्यामुळे खेळाडूंना सरकारी 5% नोकर भरती मध्ये अनेक संदीप प्राप्त होत आहेत
या खेळामध्ये मागील १३ वर्ष महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे.
अशी माहिती किशोर येवले राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन आणि महा सचिव महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट यांनी व केतन गुंजाळ नाशिक जिल्हा पिच्याक सिलॅट असोसिएशन यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *