ना. चंद्रशेखर बावनकुळे : महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडियाचे अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा उत्सहात
सांगली प्रतिनिधी।
कोविड काळात डिजीटल मिडियाने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे भविष्यात डिजीटल मिडियाच्या पाठिशी शासन राहणार आहे.
वर्तमानामध्ये आणि भविष्यामध्ये डिजिटल माध्यमांचा विस्तार वाढला आहे. डिजिटल या नवीन स्तंभाची
महाराष्ट्राला गरज आहे. सर्वच क्षेत्रात डिजीटल मिडियाचे महत्व अधोरीखित झाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे डिजिटल मिडिया प्रभावी मिडिया आहे. डिजिटल मिडियाच्या सुरक्षेबाबत विचार केला जाईल. डिजिटल मिडियातील अनेक अडचणी काही समस्या तसेच आकस्मित निधीही द्यायचा आहे. काही मागण्यासाठी सकरात्मक आहोत लवकरच त्याबाबत निर्णय घेवू, असे आश्वासन महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.








महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया, मुंबई राज्य अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, सिंधुदूर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र सुनिल फुलारी, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे तसेच जर्नालिस्ट असेसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे , महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया राज्य संघटक व महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे.प्रदेश उपाध्यक्ष अशोक देढे.प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव.संजय फुलसुंदर आ. गोपिचंद पडळकर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, विशेष पोलिस
महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र सुनिल फुलारी, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशीक, उद्योजक दिलीप कोटीभास्कर, प्रदेशाध्यक्ष -महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ स्वीकृत नगरसेवक-सोलापूर नगरपालिका मनीष केत, मुख्य प्रवक्ता भारतीय जनता पक्ष, नगरसेवक नवनाथ बन, ज्येष्ठ वैद्य डॉ. विनोद परमशेट्टी यांना पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
ना. चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, आज ज्या ज्या मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांनी विकसीत भारत, समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पुरस्कारामुळे तुमची जबाबदारी वाढली आहे. तुमच्यामध्ये क्षमता आहे म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे. तुमच्या जीवनात चांगले काम करा. त्यामुळे समाज सुधारेल. समाज सुधारणी मध्ये आता डिजिटल मिडियाची महत्वाची भूमिका असणार आहे. बावनकुळे पुढे म्हणाले, डिजिटल मिडियाच्या
माध्यमातून सर्वच क्षेत्रात उपयोग होतो. डिजिटल मिडिया म्हणजे दुधारी शस्त्र आहे. हा कसोटीची काळ आहे. डिजिटल मिडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती गेली तर कोणाचेतरी आयुष्य उध्दवस्त होवू शकतो. डिजिटल मिडियाची जेवढी क्रांती होईल ती गरज सरकारला आहे. डिजिटल मिडिया मोठा करताना काळजीही करावी लागणार आहे. विकसित भारत घडविताना मिडियाच्या माध्यमातून चांगली माहिती दिली पाहिजे. संजय भोकरे म्हणाले, ज्या सन्माननीय व्यक्तींना आपण पुरस्कार देतो. तो पुरस्कार कोणाच्याहस्ते घेतो हेही महत्वाचे असते. आयुष्य छान, थोडं लहान आहे, वेड्या लढण्यात छान आहे. अश्रूच यार माझा मधिरे समान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, हवे ते घे उचलून दुनिया दुकान आहे. कधी हसाव लागत तर कधी रडाव लागतं, सुुंदर धबधब्यासाठी उंचावरून पडावं लागतं त्यासाठी प्रयत्नही महत्वाचं आहे. असे व्यक्तीमत्व ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे आहे. त्यांच्याहस्ते सर्वांना सन्मानित केले जात आहे. डिजिटल मिडियासाठी 2 कोटींचा निधी दिला तर त्याच्या व्याजातून अनेकांना मदत मिळेल, अशी मागणीही ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
यावेळी डिजिटल मिडियातील काही पदाधिकार्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. अतिशय नियोजनबध्द कार्यक्रम पार पडला. लातूर, मुंबई, पुणे, सोलापूर, नांदेड आदी जिल्ह्यातून डिजिटल मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संवेदनशिलता माणुसकी जपले पाहिजे
संवेदनशिलता माणुसकी जपले पाहिजे जेथे चूक आहे ते बोललेच पाहिजे. डिजिटल मिडियामुळे 12 सेकंदात बातमी सर्वत्र जाते. डिजिटल
मिडियाची क्रांती 2014 मध्ये झाली. डिजिटल मिडिया हा अत्यंत महत्वाचा बनला आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या महत्वाच्या योजना या लक्षात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला जातो. आकस्मिक निधीसाठी फंड दिला जाईल.
- ना. चंद्रशेखर बावनकुळे
