पालघर येथे आदी कर्मयोगी अभियान आठवडा बैठक संपन्न

पालघर १ ऑक्टोबर:
जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे आदी कर्मयोगी अभियान आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेयर्स (MoTA) संचालिका दिपाली मासिरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली.
बैठकीपूर्वी संचालिका दिपाली मासिरकर यांनी डहाणूतील धानीवरी येथे ग्रामसभेला उपस्थित राहून रणकोळ येथे पालकांकरता आयोजित साक्षरता व आर्थिक साक्षरता कार्यक्रमास उपस्थितांना संबोधित केले. नंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आदी कर्मयोगी अभियान अंतर्गत पालघर जिल्ह्यातील संबंधित सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक पार पडली .
या वेळी डॉ. अपूर्वा बासूर प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी अभियानाचा PPT द्वारे सविस्तर आढावा सादर केला. जिल्ह्यातील विविध विभाग व स्वयंसेवी संस्थांमार्फत AKA संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांच्या यशोगाथाचे सादरीकरण केले .
आढावा बैठकीसाठी, डहाणूचे प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे , उपजिल्हाधिकारी विजया जाधव, उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


आदी कर्मयोगी अभियानात पालघरमध्ये स्थानिक संस्कृती व जीवनशैली प्रसारित करण्यासाठी सोशल मीडिया इन्स्टाग्रामवरील आमंत्रित व उपस्थित झाले होते. त्यांना “चॅम्पियन अधिकाऱ्यां पालघर” म्हणून गौरवण्यात आले. पुढे त्यांना जिल्हा प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गाभविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात आणि समाज पुर्नवर्चना हेतू योगदान घेण्याचे सांगण्यात आले.
जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आदी कर्मयोगी अभियानात पालघरची स्थानिक संस्कृती व जीवनशैली प्रसारित करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यांना “चॅम्पियन ऑफ पालघर” म्हणून गौरव करण्यात आले. पुढे त्यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थांकडून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल व आदर्श पद्धतींबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.