पिक नुकसान पाहण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक थेट शेताच्या बांधावर

पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली भात आणि चिकू पिकांच्या नुकसानीची पाहणी

शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळणार

           *…पालकमंत्री गणेश नाईक…* 

डहाणू, ता. ४ ऑक्टोबर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे असून शेतकरी यांना शासन सर्वतोपरी मदत करेल असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. विशेषतः भात पिक कापणीसाठी तयार असतानाच झालेल्या मुसळधार पावसामुळे पिक आडवे पडले असून, ओलाव्यामुळे भाताला मोड आले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतेच वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा ,आमदार राजेंद्र गावीत यांनी डहाणू तालुक्यातील विविध शेतांमध्ये जाऊन थेट पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, डहाणू तहसीलदार सुनील कोळी, तलासरी तहसीलदार अमोल पाठक,गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, उपविभागीय कृषी अधिकारी तरूणकुमार वैती आणि तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार तसेच जिल्ह्यातील अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री गणेश नाईक यांनी डहाणू तालुक्यातील पोखरण येथील शेतकरी दत्तात्रय पाटील यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेतला. भात पिकाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकारी यांना दिल्या.
यानंतर डहाणू तालुक्यातील जामशेत येथील स्नेहल अनंत पोद्दार यांच्या १२ एकर क्षेत्रावरील चिकू बागेचीही पाहणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे फुलगळ व फळगळ झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्री नाईक यांनी चिकू पिक परिस्थितीची माहिती घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत शासन देणार असल्याचे सांगितले.
तलासरी तालुक्यातील मौजे- वडवली-ओझरपाडा येथील पूरबाधित घरे व
भातशेतीची पहाणी केली. दिनांक 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वारोळी
नदीचे पाणी घरात शिरल्याने तेथील नागरीकांना थलांतरीत करावे लागले होते.
पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्थानिक नागरिक व शेतक-यांशी संवाद साधला व

आपदग्रस्त यांना शासकीय मदत देण्याबाबत आश्वस्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.