मोखाडा पोलीस ठाणे यांची कारवाई
दीपक गायकवाड – मोखाडा
दिनांक ०६/१०/२०२५ रोजी फिर्यादी नामे सोमनाथ नवसु फुफाणे, वय २० वर्षे, व्यवसाय शेती /मजुरी, रा. सातुर्ली, ता. मोखाडा, जि. पालघर यांनी मोखाडा पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून , फिर्यादी व त्यांचे वडील नवसु लाडक्या फुफाणे वय ५५ वर्षे हे त्यांचे घरी असताना दि.०६/१०/२०२५ रोजी दुपारी १२.४५ वाजताचे सुमारास १) जितेंद्र उर्फ जितु जयराम पाटील, वय ३१ वर्षे, २) रितेश उर्फ गुड्डा तुकाराम पाटील, वय २३ वर्षे, ३) प्रमोद उर्फ पन्या चिंतामण वारघडे, वय २५ वर्षे सर्व रा. सातुर्ली ता.मोखाडा, जि.पालघर यांनी फिर्यादीचे वडील नवसु लाडक्या फुफाणे वय ५५ वर्षे यांनी शेता लगत असलेल्या नदी पात्रात विषारी औषध टाकुन मासे मारु नका असे सांगितल्याचा राग मनात धरुन फिर्यादीचे वडीलांना व फिर्यादी यास फिर्यादीचे शेतावरील घरी येवुन शिवीगाळी व दमदाटी करुन लाकडी दांडक्याने मारहाण करुन फिर्यादीचे वडीलांना कास- याने बांधुन रस्त्याने ओढत सातुर्ली गावात मारझोड करत नेवुन गावात तीनही आरोपीतांनी पुन्हा फिर्यादीचे वडीलांना लाथाबुक्यांनी व लाकडांनी मारहाण केली आहे.यातच नवसू फुफाने यांचा मृत्यू झाला आहे.मोखाडा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अवघ्या १२ तासात गुन्ह्यातील ३ ही आरोपींना अटक केली आहे.
माझ्या वडिलांना नमूद इसमांनी जिवे ठार मारले आहे अशी फिर्याद सोमनाथ फुफाने यांनी दिल्याने मोखाडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १८१/२०२५ भारतीय न्याय संहिता १०३ (१), ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१(२), ३५१ (३), ३(५), प्रमाणे दिनांक ०६/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मोखाडा पोलीस ठाणे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी तपास पथके तयार केली. सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्यातील आरोपीत १) जितेंद्र उर्फ जितु जयराम पाटील, वय ३१ वर्षे, २) रितेश उर्फ गुड्डा तुकाराम पाटील, वय २३ वर्षे, ३) प्रमोद उर्फ पन्या चिंतामण वारघडे, वय २५ वर्षे सर्व रा.सातुर्ली ता.मोखाडा, जि. पालघर यांचा शोध घेवून १२ तासांचे आत वर नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा समीर मेहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग हे करत आहेत.
सदरची कारवाई ही यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, समीर मेहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / प्रेमनाथ ढोले, प्रभारी अधिकारी मोखाडा पोलीस ठाणे, पोउपनि / श्रीकांत दहिफळे, पोउपनि/प्रतिक पोकळे, पोउपनि / कार्तिक कडु, पोहवा / भास्कर कोठारी, पोहवा / कव्हा, पोहवा / गोरे, पोहवा/भरसट, पोहवा/ भोये सर्व नेमणुक मोखाडा पोलीस ठाणे यांनी केली आहे.
