मोखाडा तालुक्यात शरद पवार गटाला खिंडार

जिल्हा उपाध्यक्ष सह अनेक नेते भाजपवासी

दीपक गायकवाड – मोखाडा

मोखाडा तालुक्यात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना मधून असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला आहे.भारतीय जनता पार्टीची डहाणू येथे दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यकारणी बैठकी सोबतच जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचे पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. झालेल्या बैठकी दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना मधील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे.यात प्रामुख्याने शरद पवार गटाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष आणि मोखाडा नगरपंचायतचे गटनेते प्रमोद कोठेकर यांनी पक्षाला राम राम ठोकल्याने शरद पवार गटाची मोठी हानी झाली आहे.

पक्षप्रवेश कार्यक्रम भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार डॉ. हेमंत सवरा साहेब, आमदार हरिश्चंद्र भोये , ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे सर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम , जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे, जिल्हा चिटणीस विठ्ठल पाटील तसेच भाजपा मोखाडा तालुका अध्यक्ष मिलिंद झोले यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी मोखाडा नगरपंचायत चे नगरसेवक गटनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष अशोक मोकाशी, नगरसेविका सौ. उषा परशुराम पवार नगरसेविका वैशाली धूम पोशेरा ग्रामपंचायत सरपंच मनोहर नवले, वैभव पाटील जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल, ऋषिकेश लाडे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी, सौरभ खरोटे तालुकाध्यक्ष ओबीसी सेल, राहुल बोराडे,मनोज दामोदर पाटील शहराध्यक्ष,अक्षय हरिश्चंद्र लाडे, .पप्पू भूसारा, महेंद्र धूम, महादू खिरारी मा.सरपंच ग्रामपंचायत आसे, युवराज हडळ उपसरपंच पोशेरा, पोशेरा ग्रामपंचायत सदस्य चेतन नवले, सुनील करबट, दिलीप हाडळ, हरिश्चंद्र वळवी, रवींद्र दिवे,.ईश्वर हाडळ, माजी सरपंच करोळ पाचघर, नाशेरा येथील रमेश घाटाळ, रघुनाथ भोये, तुळशीराम वाघ, नामदेव हाडोंगा, सोमनाथ झूगरे, नरेश हाडोंगा, एकनाथ हाडोंगा, भाऊ निरगुडे, संदेश मोरगाव वाकडपाडा येथील रोहित कानात अभिषेक पारधी गोरख सारकते व इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने प्रवेश केला.
नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे मोखाडा तालुक्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षासाठी उर्जादायी ठरला असून, स्थानिक पातळीवर पक्षाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *