मोखाडा येथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न.

दीपक गायकवाड – मोखाडा

जव्हार मोखाडा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा मोखाडा येथे संपन्न झाला आहे.जिल्हा परिषद , पंचायत समिती व नगरपंचायत निवडणूकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन शिवसेना उपनेते आमदार रविंद्र फाटक यांनी मेळाव्याला संबोधित करताना केले आहे.कार्यकर्ता मेळाव्यासाठी बहूसंख्य उपस्थिती आढळून आली आहे.

शिवसेना संपर्कप्रमुख, उपनेते आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते निलेश सांबरे, जिल्हा प्रमुख वंसत चव्हाण यांनीही यावेळी मार्गदर्शन केले आहे.
यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकी साठी सज्ज व्हा अशी सुचना यावेळी फाटक यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे बाळासाहेब व दिघे साहेब यांच्या विचारांनी जनसेवा करतात व त्याच विचारांचा शिवसैनिक जव्हार मोखाडा तालुक्यात पहायला मिळतो.असे गौरवोद्गारही फाटक यांनी काढले आहेत.तर उपनेते निलेश सांबरे यांनी दोन्ही तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आव्हान कार्यकर्तेना केले आहे.
शिवसेनेच्या जोडीला जिजाऊ ची साथ मिळाली आहे त्यामुळे अधिक भक्कम आपण आहोत असे ते म्हणाले तसेच कुणी पक्षाला सोडुन गेले असतील त्यांना महत्वच देऊ नये अशी भूमिका घेऊन काम करा असेही ते पुढे म्हणाले आहेत.

जिल्हा प्रमुख वंसत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल व पक्षात येणाऱ्या तरुणांचे स्वागत आहे‌ असे प्रतिपादन केले.जिल्हा महिला संघटिका वैष्णवी रहाणे यांनी मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी लाडकी बहिण योजना सुरू केली व अनेक निर्णय महिलां करीता घेतले असे म्हटले.

यावेळी नगराध्यक्ष व तालुका प्रमुख अमोल पाटील यांनी मोखाडा तालुक्यातील पक्षाची बांधणी अधिक मजबूत केली जाईल तसेच मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहकार्याने नगरपंचायत साठी भरघोस निधी व विविध विकासकामे केली असल्याचे सांगितले.जव्हार तालुक्यातील पक्षाची भूमिका व जबाबदारी सरपंच कल्पेश राऊत यांनी मांडली.मोखाडा तालुक्यातुन माजी सभापती युवराज गिरंधले,नवसु थेतले , निलेश झुगरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संपर्क प्रमुख उपनेते रविंद्र फाटक, उपनेते निलेश सांबरे, जिल्हा प्रमुख वंसत चव्हाण, जिल्हा संघटक वैष्णवी रहाणे जेष्ठ नेते प्रल्हाद कदम, उपजिल्हा प्रमुख रविंद्र शिवदे, विधानसभा संघटक प्रदीप वाघ, तालुका प्रमुख अमोल पाटील, जव्हार तालुका प्रमुख विनायक राऊत,उपनगराध्यक्ष नवसु दिघा,माजी सभापती युवराज गिरंधले , वासुदेव खंदारे,माजी सभापती भास्कर थेतले, नगरसेवक गणेश रजपूत, अर्बन बँक अध्यक्ष असिफ लुलानिया, जव्हार, मोखाडा आजी माजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
या मेळावाचे सुत्रसंचलन हेमंत शिंगाडे यांनी तर आभार प्रदर्शन रवि मुकणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.