सोडतीत महिला व पुरुषांनाही समान जागा
दीपक गायकवाड – मोखाडा
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असून सोमवारी मोखाडा पंचायत समितीच्या सहा गणा करीता आरक्षण सोडत मोखाडा तहसीलदार कार्यालयात जाहिर करण्यात आले. आरक्षण सोडत व्हायच्या अगोदर अनेक राजकीय पक्षाचे उमेदवार गुडघे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते परंतु आरक्षण सोडत झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांचा पुरता हिरमोड झालेला आहे.
मोखाडा तालुका अंतर्गत पंचायत समितीचे सहा गण येतात या सहा गणा मध्ये पुर्वी तीन गण अनुसूचित जमाती महिला तर तीन गण अनुसूचित जमाती पुरुष यांच्या करीता होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये असलेल्या गणा मध्ये फार काही बदल झालेला नसून जेथे पुरुष आरक्षण होते तेथे महिला उमेदवारांकरीता राखीव झाले आहेत. तर महिला आरक्षणाच्या ठिकाणी पुरुषाकरीता उमेदवारीची सोडत निघाली आहे. तर पुर्वी अनुसूचित जमाती महिला करीता राखीव असलेला
मो-हांडा, सायदे पंचायत समिती गण दुसऱ्यांदा अनुसूचित जमाती महिला साठी राखीव बनला आहे त्यामुळे मो-हांडा आणि सायदे पं.समिती गणा मध्ये पुरुष आरक्षण पडेल या आशेवर असलेले उमेदवार नाराज झाले असून हरकत नोंदविणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले आहे.
सहा पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत –
मागील पंचवार्षीक निवडणूक ( २०२०- २५ ) आरक्षण …
१) आसे पं.समिती गण – अनु.जमाती पुरुष
२) मो-हांडा पं.समिती गण – अनु.जमाती महिला.
३) पोशेरा पं.समिती गण – अनु.जमाती महिला.
४) सातुर्ली पं.समिती गण – अनु.जमाती पुरुष.
५) खोडाळा पं.समिती गण – अनु.जमाती पुरुष
६) सायदे पं.समिती गण – अनु.जमाती महिला.
आताची नवीन सोडत ( २०२५ -२६ )
१) आसे पं.समिती गण – अनु.जमाती महिला.
२) मो-हांडा पं.समिती गण – अनु.जमाती महिला.
३) सायदे पं.समिती गण – अनु.जमाती महिला.
४) पोशेरा पं.समिती गण – अनु.जमाती पुरुष.
५) सातुर्ली पं.समिती गण – अनु.जमाती पुरुष.
६) खोडाळा पं.समिती गण – अनु.जमाती पुरुष.
अशा प्रकारे आरक्षण पडलेले आहे. त्यामूळे या सहाही गणांतील इच्छूकांना प्रचाराचा मार्ग मोकळा झालेला आहे.
