रुग्णवाहिका आणि दुचाकीत भिषण अपघात

दोघे दुचाकीस्वार जागीच ठार

दीपक गायकवाड – मोखाडा

जव्हार कडून नाशिक कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिका क्रमांक एम् एच 14 एल एक्स 1884 ही जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम् एच 48 एम 5715 या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरिल चालक अनील सीताराम खरपडे व मागे बसलेला चिंतामण कृष्णा किरकिरे हे दोघे ठार झालेले असून रुग्णवाहिका चालकालाही दुखापत झाली असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोखाडा पोलिस ठाण्याकडून समजलेली हकिगत अशी की, दिनांक 24/10/2025 रोजी रात्रौ 08.15 वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णवाहिका क्रमांक एम, एच. 14 एल. एक्स 1884 यावरील चालक नामे रमेश रामराव बर्डे, वय 45 वर्षे, व्यावसाय नोकरी राहणार जव्हार, ता. जव्हार. जि. पालघर. याने त्याचे
ताब्यातील रुग्णवाहिका जव्हार बाजुकडुन नाशिक बाजुकडे चालवुन घेवुन जातांना रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन हयगयीने अविचाराने चालुवन निळमाती गावच्या मागे वळणावर नाशिक बाजुकडुन मोखाडा बाजुकडे येणारी मोटार सायकल क्रमांक
एम.एच. 48 एम. 5715 हीस जोराची ठोकर मारुन अपघात करुन सदर आपघातात मोटार सायकल वरील चालक नामे अनिल सिताराम खरपडे व त्याच्या मागे बसलेला इसम नामे चिंतामण कृष्णा किरकिरे यांच्या शरीवार व अंर्तगत गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या जखमा करुन त्यांचे मरणास कारणीभूत
झाला म्हणून चालक बर्डे यांच्या वर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तसेच त्यालाही दुखापत झालेली असल्याने त्याच्यावर उपचार करुन त्याला ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रेमनाथ ढोले यांनी दिली आहे .‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.