दीपक गायकवाड – मोखाडा
वारकरी सांप्रदाय हा प्रमुख भक्तिमार्गातील निर्लॅप सांप्रदाय आहे. त्याच वारकरी साहित्य परिषदेच्या मोखाडा तालुका अध्यक्षपदी अति दुर्गम अशा डोंगरवाडी येथील हरिभक्त परायण रमेश महाराज वाघ या आदिवासी समाजातील देव भोळ्या व्यक्तीची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आलेली आहे.यावेळी खोडाळा आणि परिसरातील अनेक वारकरी सांप्रदायिक मान्यवर उपस्थित होते.
वारकरी सांप्रदाय हा महाराष्ट्रातील एक प्रमुख भक्तीसांप्रदाय आहे. जो पंढरपूरचा विठ्ठल देव म्हणून भक्तीभावाने पूजतो आणि आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरला तन्मयतेने पायी वारी करतो.संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीतून ज्ञानेश्वरी सारखा भक्ती रसात ओथंबलेला ग्रंथ दिला आहे.या ग्रंथाने आपल्याला तात्विक आणि नैतिक अधिष्ठान दिले आहे तर संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी किर्तन सेवेचा विकास केला असून त्यामुळे समाजप्रबोधनाचे कार्य घडून आले आहे. या सांप्रदायाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्व जाती धर्माचे लोक सहर्ष सहभागी होतात.या संप्रदायाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्व जाती-धर्माचे लोक सहचर भावनेतून सामील होतात हरिपाठ नामसंकीर्तन एकादशी, द्वादशीला प्रदोष आदी उपवासाचे काटेकोर पणे पालन केले जाते.
यावेळी महिला तालुका अध्यक्षा भारती गवारी, मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप वाघ, खोडाळा येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. मिठाराम कडव, निवृत्त मुख्याध्यापक दिनकर खाडे, महिला भजणी मंडळाच्या संचालिका प्रमिलाताई कदम, पुरुष मंडळाचे संचालक सुनील काळे आदी मान्यवर उपस्थित होते
रमेश महाराज वाघ यांचे मोखाडा तालुक्यातील वारकरी सांप्रदायाशी अतिशय चांगले संबंध आहेत तसेच आषाढी कार्तिकी या नैमित्तिक वारीमध्ये त्यांचे विशेष योगदान असते.त्यांचा संबंध जिल्ह्यात सर्वत्र असून त्यांना विषय विशेष जाणीव आहे त्यामुळे त्यांची नियुक्ती ही वारकरी साहित्य परिषदेसाठी एक नवी ऊर्जा देणार असल्याचे मत वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी व्यक्त केले आहे.
