डोल्हारा माध्यमिक विद्यालयात तालुका स्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन
दीपक गायकवाड – खोडाळा
“विद्यालयाचा सर्वांगीण झाला झाला पाहिजे..! “. तसेच शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा समतोल साधूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो,” असे प्रतिपादन केले. आदिवासी माध्यमिक विद्यालय, डोल्हारा येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा विक्रमगड विधानसभा क्षेत्राचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
शैक्षणिक सुविधांच्या उभारणीसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासनही यावेळी भोये यांनी दिले. “या क्षेत्रात जी मदत पाहिजे ती आम्ही नक्की करू. विज्ञानासारख्या क्षेत्रात ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांनी उंच भरारी घ्यावी,व त्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न करू,” असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.फक्त “जिद्दीने प्रयत्न करा, मोठी यश तुमच्या पायाशी लोळत येतील.”एव्हढी ताकद संपादीत करा असे आवाहनही आमदारांनी विद्यार्थ्यांना केले आहे.“बालवयातच मुलांच्या मनात प्रश्न निर्माण होतात; हेच प्रश्न पुढे विज्ञानाची वाट दाखवतात,” असे प्रतिपादन करत त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष चोथे, एज्यु केशन सोसायटी अंबरनाथ चे उपाध्यक्ष अशोक
कुलकर्णी , शाळा समितीचे अध्यक्ष प्रसाद जोशी,
भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद झोले, गटशिक्षणाधिकारी गीता मसराम, स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे,मुख्याध्यापक सुरेश मोरे, डोल्हारा ग्रामपंचायत सरपंच ताईबाई जाधव, उपसरपंच आनंद दोरे, बहुसंख्य स्थानिक ग्रामस्थ आणि मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील बाल वैज्ञानिक विद्यार्थी व शिक्षक हजर होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप वाघ यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विज्ञानाची आवड टिकवून ठेवत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांतही पुढे यावे असे आवाहनही वाघ यांनी केले आहे.
विज्ञान प्रदर्शनात विविध वैज्ञानिक प्रयोग, मॉडेल्स, पर्यावरणपूरक संकल्पना, तंत्रज्ञानातील नवकल्पना अशा अनेक विषयांवरील प्रकल्पांची विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने मांडणी करून सादरीकरण केले होते.या प्रदर्शनाला पालक व ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.आदिवासी माध्यमिक विद्यालयाच्या सर्वच शिक्षकांनी त्यासाठी चांगली मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येथील शिक्षक चुडामन पाटील यांनी समयसुचकपणे केले आहे.
