पी. एम किसान योजनेचा २२ वा हप्ता

केंद्र शासनाने सुरु केलेल्या पंतप्रधान किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६०००/ सहा रुपये मिळतात. देशभरात ९ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
पी. एम किसान योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी PMKiSAN पोर्टल वर पात्रता तपासावी,असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी, अधिकृत फार्मर आयडी आणि आधार-बॅंक लिंक पूर्ण असणे अनिवार्य आहे तसेच जमीनीची माहिती अद्ययावत असणे गरजेचे आहे.या अटींची पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
रब्बी हंगामातील पिकांसाठी बियाणे , खते आणि मजुरीचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होईल.पी. एम योजनेचा लाभाचा २२ वा हप्ता जानेवारी २०२६ मध्ये मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *