लाल बावटा कामगार युनियनच्या वरले शाखेचे उदघाटन

वाडा-वरले येथे लाल बावटा पुरस्कृत सी. आय.टी.यु.कामगार फलकाचे अनावरण माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार श्री. विनोद निकोले यांच्या हस्ते झाले
वाडा– वाडा तालुक्यातील वरले येथील टिना रबर अँण्ड इंनफ्रासट्रक्चर लि. कंपनीमध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कामगार युनियनचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
या कंपनीच्या मॅनेजमेंटकडे पत्र व्यवहार करु, चर्चा करु तसेच कामगारांनी कामामध्ये कुचराई करु नये, असे आमदार निकोले यांनी या प्रसंगी कामगारांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
या कामगार युनियन नामकरण फलकाच्या अनावरण प्रसंगी माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते दिलीप गोतारणे,कुंदन पाटील,पप्पू जैन, सो. इंदू धिंडा, विलास वाघात, विलास धिंडा,साधना बरफ,तसेच कामगार युनियनचे पदाधिकारी किशोर सातवी, विलास कडव. नरेश गुरोडा,राजेश कडव,दिनेश गोवारी, बळीराम दुमाला इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *