सांगवडे(मावळ) : ग्रामपंचायत व पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गावात सहभागात्मक ग्रामीण मूल्यमापन (Participatory Rural Appraisal – PRA) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून गावातील सामाजिक, आर्थिक व कृषीविषयक माहिती संकलित केली.

कृषी कन्यांनी गावाचा सामाजिक व संसाधन नकाशा तयार करण्याचे काम केले असून या प्रक्रियेत गावचे माननीय सरपंच रोहन जगताप यांनी स्वतः पुढाकार घेत नकाशा ओळखून देण्यासाठी व काढण्यासाठी मार्गदर्शन केले. रस्ते, पाण्याचे स्रोत, शेती क्षेत्र व सार्वजनिक सुविधा यांची नोंद कृषी कन्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने केली.
या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी कृषी कन्या नंदिनी दोरगे, प्रेरणा धोत्रे, दिशा चव्हाण, सई पाटील, श्वेता मारडकर या उपस्थित होत्या. कृषी कन्यांनी PRA तंत्रांची माहिती देत समस्या विश्लेषण व हंगामी कॅलेंडर याबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे गावाच्या विकासासाठी आवश्यक माहिती संकलित झाली असून भविष्यातील नियोजनासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
