रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत तुर्भे वाहतूक शाखेचा जनजागृती कार्यक्रम

नवी मुंबई | प्रतिनिधी – विष्णु बुरे

रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने तुर्भे वाहतूक शाखा, नवी मुंबई यांच्या वतीने प्रभात डेरी, तुर्भे येथे नागरिक व वाहनचालकांसाठी जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे हा होता.

या कार्यक्रमात वाहनचालकांना दारू पिऊन वाहन चालवू नये, सिग्नल जंप करू नये, वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करावा तसेच अति वेगाने वाहन चालवू नये, अशा महत्त्वाच्या वाहतूक नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.

या जनजागृती कार्यक्रमास तुर्भे वाहतूक शाखेचे PSI कोकणी, ASI पाटील तसेच PN/4457 ढेंबरे हे पोलीस अंमलदार उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नागरिक व वाहनचालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला.

सदर कार्यक्रमास उपस्थित नागरिक व वाहनचालकांनी उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अशा उपक्रमांमुळे रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *