जुन्नर:
जुन्नर पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी कुसूर गणातून भारतीय जनता पार्टीने श्री. निलेश सुगंधा सीताराम चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाच्या वतीने त्यांना कमळ चिन्ह देऊन निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
निलेश चव्हाण यांचा जन्म निमगाव तर्फे म्हाळुंगे येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वडज येथे, तर माध्यमिक शिक्षण श्री कुलस्वामी माध्यमिक विद्यालय, वडज येथे पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी जुन्नर येथील शिवछत्रपती महाविद्यालयात १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
“कष्ट हेच भांडवल” आणि समाजकारणाला राजकारणाची जोड देत २४ तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणे हेच आपले ध्येय असल्याचे निलेश चव्हाण यांनी सांगितले. भाजपाच्या नेत्या सौ. आशाताई बुचके यांच्या मार्गदर्शनाखाली ते ही निवडणूक लढवत आहेत.
कुसूर गणातील जनतेमध्ये निलेश चव्हाण यांच्याबद्दल मोठा विश्वास असून, “भाजपाचे उमेदवार निलेश चव्हाण कमळ नक्कीच फुलवतील” असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
