पाठीवर मारा, पोटावर नको! मुरबाडमधील गरीब हातगाडीवाल्यांवर पोलिसांची लाथ

मुरबाड प्रतिनिधी | जन मेट्रो वडापाव विकून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या गरीब हातगाडीवाल्यांवर येथील पोलिसांची कारवाई सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. एसटी स्टॅन्ड समोर हातावर पोट भरणाऱ्या टपरीवाल्यांवर महिन्यात दोनदा दंड आकारला जात असल्याने “पोट भरावे की दंड भरावे?” असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे वर्षभर बंद असलेले हे व्यावसायिक गेल्या महिनाभरापूर्वी…

Read More

विकासाच्या नावाखाली आदिवासी आणि शेतकऱ्यांचे विस्थापन आम्ही मान्य करणार नाही – डॉ. अजित नवले

वाढवण बंदर, कर्जमाफी, मनरेगा, रेल्वे व वनहक्कांवर स्पष्ट भूमिका किसान सभेचे राष्ट्रीय नेते डॉ. अजित नवले यांची विशेष मुलाखत जन मेट्रो | विशेष मुलाखत पालघरमध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांनी काढलेला लॉंग मार्च सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतो आहे. वाढवण बंदर, वनजमिनींचे हक्क, स्मार्ट मीटर, मनरेगा, रेल्वे प्रकल्प आणि कर्जमाफी या प्रश्नांवर…

Read More

पालघरमधील ‘लाल वादळ’ शांत! माकपचे आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर निर्णय

पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी पालघर: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) भव्य ठिय्या आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली आहे. चर्चेत काय ठरले? सलग…

Read More

पालघरमध्ये लाल वादळाचा मुक्काम!

आज आंदोलनाचा तिसरा दिवस; ११ वाजताच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी पालघर: वाढवण बंदराचा विरोध आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) ऐतिहासिक ठिया आंदोलन आज (बुधवारी) तिसऱ्या दिवसात प्रवेश करत आहे. काल संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले ६० ते ६५ हजार शेतकऱ्यांचे हे ‘लाल वादळ’ सध्या पालघरच्या रस्त्यांवर ठाण मांडून…

Read More

मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयावर कूच करू; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

​पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी पालघर: पालघरच्या भूमीवर पुन्हा एकदा लाल बावटा फडकला असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI-M) नेतृत्वाखाली निघालेल्या भव्य ‘लॉंग मार्च’ने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. डहाणूच्या चारोटीतून सोमवारी (१९ जानेवारी) निघालेला हा विराट मोर्चा मासवणमार्गे आज (२० जानेवारी) संध्याकाळपर्यंत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात तब्बल ९० हजारांहून अधिक कष्टकरी, शेतकरी…

Read More

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वाडा तालुक्यात बळी.

​वाडा | प्रतिनिधीवाडा तालुक्यातील तिळशे गावाच्या हद्दीतील तिलशे कोदे दळवी पाडा येथे आज (दि. ४) सकाळी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका ४३ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणपत लक्ष्मण दळवी (वय ४३) असे मृत व्यक्तीचे नाव असून, रस्त्यावर तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ​नेमकी घटना…

Read More

पी. एम किसान योजनेचा २२ वा हप्ता

केंद्र शासनाने सुरु केलेल्या पंतप्रधान किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६०००/ सहा रुपये मिळतात. देशभरात ९ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.पी. एम किसान योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी PMKiSAN पोर्टल वर पात्रता तपासावी,असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येतो.योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी, अधिकृत फार्मर आयडी आणि आधार-बॅंक लिंक पूर्ण असणे अनिवार्य आहे तसेच जमीनीची माहिती…

Read More

महाराष्ट्रात नवीन रेशन कार्ड मिळणे अधिक सोपे

मुंबई -महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नवीन रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नवीन नियम लागू करत नवीन रेशन कार्डसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या निर्णयामुळे बनावट व अपात्र लाभार्थ्यांवर आळा बसणार असून खऱ्या गरजू कुटुंबांना लाभ मिळणार आहे.राज्य सरकारच्या माहितीनुसार, 1 जानेवारी…

Read More

एस.टी. बस स्थानक दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम; महामंडळाकडून मोठी घोषणा

मुंबई —महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) राज्यातील सर्व एस.टी. बस स्थानकांवर दर पंधरा दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा 31 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली. ही मोहीम बस स्थानकांचे आरोग्यदायी, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण राखण्यावर केंद्रित आहे.मोहीमेचा फोकस फक्त बसस्थानकांच्या मुख्य परिसरावरच नाही, तर स्थानकांच्या जवळच्या परिसर आणि प्रशासकीय इमारतींवरही…

Read More

पालघर जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात मराठी बोलीभाषा व लोककलेचा जागर

जव्हारमध्ये दोन दिवसीय जिल्हास्तरीय साहित्य महोत्सवाला साहित्यिक–रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जव्हार प्रतिनिधी : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय, जव्हार (जि. पालघर) यांच्या वतीने आयोजित पालघर जिल्हास्तरीय साहित्य संमेलन शनिवार दि. २७ व रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी ग. बा. सरदार साहित्य…

Read More